चला  आयुष्य  गुंफुया !

क्षण एक, मनास भिजवी चीम्म्ब,
क्षण एक, मनातील सुख प्रतिबिंब.

क्षण एक, मनात सुखाची झ्हालर,
क्षण एक, मनात स्वप्नांची भुरळ.

क्षण एक, मनातील दीप प्रज्वलित,
क्षण एक, मनातील साठले गुपित.

क्षण एक, मनातील असे एकल कोंडा,
क्षण एक, मनातील दुक्खाचा धोंडा.

क्षण एक, मनातील आस्वांचे तळे,
क्षण एक, मनात प्रीतीचे मळे.

क्षण एक, मनातील अनामिक हुरहूर,
क्षण एक, मनातील माजले काहूर.

क्षण एक, मनातील ओल्या मायेचा,
क्षण एक, मनातील प्रेमाच्या सायीचा.

क्षण एक, मनातील हिरवे हितगुज,
क्षण एक, मनातील पाखरांचे अलगुज.

क्षण एक, मनातील रिता रिकामा,
क्षण एक, मनातील नवा बहाणा.

क्षण एक मनातील, शात, सस्वर,
क्षण एक, मनातील ….मखमली, धूसर.

क्षण एक, मनातील देवाचे नमन,
क्षण एक, मनातील भावनांचे हवन.

क्षण एक, मनातील लाटेचा हेलकावा,
क्षण एक, मनातील सुरेल पावा.

क्षण एक, मनातील कोमल, तरल,
क्षण एक, मनातील, वाट सरळ.

क्षण एक, मनातील, फुलांचा ताटवा,
क्षण एक, मनातील उन्हाचा चटका.

क्षण एक, मनातील घाली साद,
क्षण एक, मनातील निरर्थक वाद.

क्षण एक, मनातील नाजूक हसरा,
क्षण एक, मनातील मोर पिसारा.

क्षण एक असा आणि क्षण एक तसा,
क्षण वेचत, वेचत,….. चला  आयुष्य  गुंफुया!

Comments

Popular posts from this blog

LIFE is a…..

Compulsive Creations